!DOCTYPE html>
तंत्रज्ञानाचा योग्य वापर मानवी जीवनात केल्यास जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. निसर्गाचे संवर्धन, झाडांची जपणूक व्हावी तसेच झाडाच्या जवळच काही सेकंदात त्याची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी तिने झाडांचे QR Code तयार केले आहेत. २२५ हून अधिक विविध प्रजातीच्या झाडांचे QR Code ची निर्मिती करत झाडांना बोलके करण्याचा प्रयत्न तिने केला आहे. उंटवाडी नाशिक येथील २५० वर्ष जुने वडाचे झाड वाचविण्याच्या मोहिमेत आदिश्रीने सहभाग नोंदवत त्या झाडाला QR Code लावून त्याचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.